कार्यकर्ताच चळवळीचा खरा कणा-पक्षप्रमुख राजूभाई साबळे..रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर खुलताबाद येथे उत्साहात संपन्न
खुलताबाद (प्रतिनिधी):-रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने दि.३१ ऑक्टोबर २०२५ रोजी खुलताबाद येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर उत्साहात पार पडले.या शिबिराला पक्षाचे प्रमुख राजूभाई साबळे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात साबळे म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच पक्ष आणि चळवळी उभ्या राहतात.अनेकांनी कार्यकर्त्यांचा केवळ स्वार्थासाठी वापर केला,मात्र आपण कार्यकर्त्यांना सक्षम,सजग आणि नेतृत्वक्षम बनविण्याचे कार्य करणार आहोत.कार्यकर्त्याने एका समाजापुरते मर्यादित न राहता व्यापक लोकहिताचा विचार करावा.चळवळीचा आणि पक्षाचा मुख्य कणा म्हणजे कार्यकर्ता हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे.”शिबिरात पक्षाचे विधीतज्ञ व राज्य उपाध्यक्ष ॲड.अविनाश थिट्टे यांनी पक्षाची बांधणी,विचारधारा आणि शिव–फुले–शाहू–आंबेडकरांच्या विचारांचे तत्त्वज्ञान तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उपाय योजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

राज्य सचिव सुरेश शिनगारे यांनी समाजातील शोषित,पीडित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी एकजुटीने कार्य करून पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात शहराध्यक्ष रणजित मनोरे आणि युवा शहर कार्याध्यक्ष जहीर शेख यांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा सत्कार करण्यात आला. शिबिराचे प्रास्ताविक मराठवाडा उपनेते जयनाथ बोर्डे यांनी केले, तर जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे यांनी सूत्रसंचालन केले.आभार प्रदर्शन शहराध्यक्ष रणजित मनोरे यांनी मानले.
या प्रसंगी मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, युवा शहराध्यक्ष अर्शद लखपती, तालुका अध्यक्ष मंगेश कसारे, ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे, राजकुमार अमोलिक, RPM ऑटो युनियन अध्यक्ष प्रदीप धनेधर, अनिस गंगापूरकर, विजय सदावर्ते, शाहिद लखपती, अनिल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल मनोरे, विजेंद्र खरात, रोहित चौथमल, आकाश माघाडे, विनायक लव्हे, संतोष साळवे, राहुल पवार, कुणाल मनोरे, कडुबा म्हस्के, के.के. कुलकर्णी, नितेश तांगडे, अनिल अलकुंडे, सिद्धार्थ साळवे, राहुल फटाकडे, शाकीर जेके, कलीम पटेल, नौशाद लखपती (हाजी) यांनी परिश्रम घेतले.यावेळी कार्यकर्त्यांसाठी भोजन व चहापाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
