वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी शहर वाहतूक शाखेची धडक नाकाबंदी मोहीम..!३९ वाहन चालकांवर कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहर वाहतुकीत शिस्त व सुरक्षितता राखण्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने आज दि.१ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पत्रकार चौक येथे विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत विविध नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर मोटर वाहन कायद्यान्वये एकूण ३९ केसेस दाखल करण्यात आल्या असून, ३६, ६०० रु.इतका दंड वसूल करण्यात आला.

कारवाईत पुढीलप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले
🔹ट्रिपल सीट — १४
🔹तुटलेली नंबर प्लेट — ०९
🔹 ब्लॅक फिल्म — ०१
🔹मोबाईलवर बोलणे — ०४
🔹सीट बेल्ट न वापरणे — ०३
🔹परवाना जवळ न बाळगणे — ०८
🔹अनपेड दंड — ₹३२,६००
🔹रोख दंड — ₹४,०००
🔹एकूण दंड रक्कम — ₹३६,६००
ही संपूर्ण कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अहिल्यानगर शहर डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे,पोलीस उपनिरीक्षक रवींद्र घायतडक,शमुवेल गायकवाड, सहाय्यक फौजदार रामराव शिरसाट,प्रकाश नाईक,गणेश आरने,तसेच पोलीस कर्मचारी बापू उंडे व विकास सातपुते यांनी सहभाग घेतला.वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखेने नागरिकांना केले आहे.
