जनतेचा माणूस रणांगणात..! प्रभाग क्रमांक ३ मधून सामाजिक कार्यकर्ते शेखर तुंगार यांची निवडणुकीच्या रिंगणात एंट्री…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग ३ मधून सामाजिक कार्यकर्ते शेखर तुंगार यांनी अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.त्यांच्या या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक तीनमध्ये निवडणुकीची चुरस आणखी रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे.सहकारनगर परिसरात अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य,लोककल्याण आणि जनतेच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवत असलेले शेखर तुंगार हे स्थानिक पातळीवर जनतेत लोकप्रिय नाव आहे. परिसरातील सहकारनगर तीन मंदिर परिसरातील सामाजिक उपक्रम,दिंडी सोहळ्यातील सक्रिय सहभाग आणि सामुदायिक एकतेसाठीच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना सर्व स्तरातून मोठा जनाधार मिळत आहे.
गत काही वर्षांपासून शेखर तुंगार यांनी रस्ते,पाणीपुरवठा, स्वच्छता,युवक रोजगार,कोविड काळात नागरिकांना मदत तसेच वंचित घटकांच्या हक्कांसाठी आवाज उठवत अनेक आंदोलने आणि जनजागृती मोहीम राबवल्या आहेत.त्यांचे म्हणणे आहे की, “प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता हेच माझं प्राधान्य असेल.राजकारण हे माझ्यासाठी पदासाठी नव्हे, तर सेवेसाठीचं साधन आहे.”सहकारनगरातील तीन मंदिर परिसरात पार पडलेल्या भव्य दिंडी सोहळ्यात त्यांनी सहभाग घेतला होता.या वेळी नागरिकांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. नागरिकांनी ‘आपला माणूस आमच्यासाठी उभा आहे!’ अशा घोषणा देत त्यांना मनापासून पाठिंबा दिला.स्थानिक तरुणाई, महिलावर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,त्यांचा हा जनआधारित लढा प्रभाग क्रमांक तीनमध्ये नवा अध्याय लिहिणारा ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
