इंजि.यश शहा यांच्या पुढाकाराला यश..!अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाकडून जैन साधू-साध्वींना ‘विहार सुरक्षा व सुविधा’ देण्याचे आदेश जारी

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मिशन सेफ विहार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष इंजिनीयर यश प्रमोद शहा यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून,अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने जैन साधू-साध्वी भगवंतांना त्यांच्या विहार पदभ्रमण काळात पोलीस सुरक्षा तसेच इतर शासकीय सुविधा देण्यासंबंधी आदेश पत्रक तात्काळ जारी केले आहे.जैन समाजाचा चातुर्मास पर्व दि.५ नोव्हेंबर रोजी संपला असून, आता सकल जैन समाजातील साधू-साध्वी भगवंतांचा विहार (पदभ्रमण) सुरू होत आहे.या विहारा दरम्यान त्यांचा प्रवास सुरक्षित,सोयीस्कर आणि सुखरूप व्हावा यासाठी मिशन सेफ विहार ग्रुपचे अध्यक्ष इंजि. यश शहा यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांना ईमेल व दूरध्वनीद्वारे विनंती केली होती.शहा यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने आदेश परिपत्रक जारी केले असून,त्यानुसार जिल्हा पोलीस प्रशासन,महानगरपालिका,जिल्हा परिषद,नगरपालिका अधिकारी, शासकीय संस्था यांना विहार काळात साधू-साध्वी भगवंतांना पोलीस संरक्षण,तात्पुरत्या मुक्कामाची व्यवस्था,सार्वजनिक ठिकाणी प्रवचनांसाठी जागा उपलब्ध करून देणे इत्यादी बाबींसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यासोबतच मुख्यमंत्री कार्यालय व अल्पसंख्यांक विभागालाही इंजि.शहा यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर साधू-साध्वींच्या विहार दरम्यान सुरक्षा व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ईमेलद्वारे केली होती.या ईमेलची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेत ती संबंधित गृह विभाग आणि पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवली आहे, असे शहा यांना अधिकृतरीत्या कळविण्यात आले आहे.यानंतर इंजि.यश शहा यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक विभाग परिक्षेत्र,अहिल्यानगर पोलिस अधीक्षक,उपअधीक्षक, सर्व पोलीस निरीक्षक,जिल्हा परिषद,महानगरपालिका तसेच पोलिस कंट्रोल रूम यांना या आदेशाची प्रत ईमेलद्वारे तसेच दूरध्वनीद्वारे पाठवून तात्काळ कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.जैन समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासन,पोलीस विभाग आणि सर्व शासकीय यंत्रणांचे मागील वर्षी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले असून,यंदाही असेच सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.
इंजिनीयर यश प्रमोद शहा
संस्थापक अध्यक्ष, मिशन सेफ विहार ग्रुप 📞 मो.नं. ९२७०११२२२३
