देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणूक शहर विकास आघाडीची जोरदार तयारी..! आरपीआय जिल्हाध्यक्ष मा. नगरसेवक सुरेंद्र थोरात आघाडीचे संभाव्य उमेदवार..
श्रीरामपूर (प्रतिनिधी):-देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.भाजप,राष्ट्रवादी,काँग्रेस, आरपीआय आदी पक्षांत गाठीभेटी सुरू झाल्या असून सर्वच गट आपल्या उमेदवाराला बळ देण्यासाठी सज्ज झाले आहेत.या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध समाज घटकांना एकत्र आणून “शहर विकास आघाडी” स्थापन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.या आघाडीच्या माध्यमातून एकाच उमेदवाराला पाठिंबा देऊन शहरात एकसंघ नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीनुसार,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष तथा मा.नगरसेवक सुरेंद्र थोरात यांचे नाव आघाडीच्या संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आले असून त्यांच्या उमेदवारीवर शहरातील विविध समाज घटक, व्यावसायिक,तसेच नागरिक वर्ग एकमताने आनंद व्यक्त करत आहेत.सुरेंद्र थोरात हे समाजाभिमुख कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.शहरातील विकासकामे,पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे “शहर विकास आघाडी”च्या उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे येणे ही अपेक्षितच बाब मानली जात आहे.आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मते, “सर्व पक्षीय आणि समाजघटकांना एकत्र आणून विकासाभिमुख आणि प्रामाणिक नेतृत्व उभे करणे हेच आमचे ध्येय आहे. नगराध्यक्षपदासाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांना एकमताने पाठिंबा दिला गेला तर देवळाली प्रवरा नगरपरिषदेत ऐतिहासिक विजय मिळणार यात शंका नाही.”या हालचालींमुळे देवळाली प्रवरा येथील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
