फटाका सायलंसर वाल्यांना शहर वाहतूक शाखेची चपराक…१८ बुलेट जप्त..१ लाखाहून अधिक दंड वसूल
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरातील शांतता भंग करणाऱ्या फटाका सायलंसर लावलेल्या बुलेट मोटारसायकल धारकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेने मोठी मोहीम हाती घेतली आहे.या मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 18 बुलेट मोटारसायकलींवर कारवाई करून तब्बल ₹20,000 दंड वसूल करण्यात आला आहे.शनिवारी विशेष मोहिमे दरम्यान 8 बुलेटवर कारवाई करून त्या वाहनांना जप्त करण्यात आले,तसेच मॉडिफाइड सायलंसर काढून टाकण्यात आले.संबंधित चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून ₹8,000 दंड वसूल करण्यात आला.झालेल्या कारवाईत सचिन राजू येमूल, परमेश्वर आढाव,राकेश जाधव, युवराज आढाव,राकेश सपाट, कारभारी माधव शिंदे,सौरभ राजेंद्र ढोकरिया,आणि राजेंद्र जिजाबा खरसे या चालकांवर कारवाई करण्यात आली.याशिवाय वाहतूक शाखेने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 4 वाहनांवर आणि दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या 2 चालकांवर कारवाई करून खटले मा. न्यायालयात दाखल केले आहेत.
एकूण 87 केसेस दाखल करून ₹1,01,950 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब परदेशी,पोलीस उपनिरीक्षक संजय गवळी,पोलीस उपनिरीक्षक शामूवेल गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक कैलास बोटे,पोलीस उपनिरीक्षक मन्सूर सय्यद, सहाय्यक फौजदार रामराव शिरसाठ,सहाय्यक फौजदार गणेश आरणे,हेड कॉन्स्टेबल सोपान गिऱ्हे,हेड कॉन्स्टेबल जहीर शेख व पोलीस कॉन्स्टेबल मधुकर ससे यांनी सहभाग घेतला.वाहतूक शाखेकडून शहरातील सर्व बुलेटधारकांना मॉडिफाईड सायलंसर काढून टाकण्याचे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
