रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचा विस्तार..!प्रभाग क्रमांक 20 मध्ये शाखा नामफलकाचे भव्य अनावरण.. लोकनेते राजूभाई साबळे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवेसाठी नवी दिशा!
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 20, शिवशंकर कॉलनी, बौद्ध नगर शाखेचा नामफलक अनावरण सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला. पक्ष प्रमुख लोकनेते राजूभाई साबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष दिनेश गवळे यांच्या हस्ते करण्यात आले.या भव्य कार्यक्रमाला पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अँड.अविनाश थिट्टे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात,मराठवाडा संघटक साहेबराव जाधव,ज्ञानेश्वर खंदारे, उमेश खडसे,जयनाथ बोर्डे, अर्शद लखपती,अरूणा साठे,कल्पना जमधडे,प्रकाश घोरपडे, राजकुमार अमोलिक,प्रदीप धनेधर,भिमराव गाडेकर,झहीर शेख,विजय सदावर्ते,राजू उजगरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.ही शाखा शहराध्यक्ष रणजित मनोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली असून उद्घाटनप्रसंगी पक्षप्रमुख राजूभाई साबळे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की,या शाखेच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टीचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवले जातील. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून प्रभागाच्या विकासासाठी कार्यकर्ते अथक प्रयत्न करतील.
शाखेच्या नव्याने निवडलेल्या कार्यकारिणीत अध्यक्ष सागर खरात,उपाध्यक्ष अमित साळवे,सचिव अजय अहिरे,संघटक सुनील कांबळे तर सदस्य म्हणून मिलिंद सदाशिव, अनिल दिवेकर,अविनाश गायकवाड,सुमित जाधव,बाळू खरात,रमेश चव्हाण,सुभाष बहिरे,सुमेध कांबळे,प्रेम थोरात, प्रेम बलखंडे, उत्तम उणे यांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वी पार पडण्यासाठी प्रमोद देहाडे, गणेश दाभाडे, संतोष साळवे, आनंद तायडे, हन्नु नाना, आवेस भाई, अविनाश बलखंडे, सय्यद अन्सार, कडूबा म्हस्के, विनायक लव्हे, अविनाश गायकवाड, संजय पवार, संतोष निकाळजे, आतीष कांबळे, दिलीप जाधव, युसूफ, आमेर खान, धनराज तुसमड, जगन खरात, काशिनाथ जोहारे यांनी मोलाचे योगदान दिले.
🎯 शाखेचे ध्येय
या नव्या शाखेच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचवणे, तसेच सामाजिक सलोखा आणि प्रभाग विकासाला नवी गती देणे, हेच या शाखेचे उद्दिष्ट आहे.
