रिक्षाचालकांच्या हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे दमदार पाऊल त्रिमूर्ती चौक रिक्षा स्टँडचे भव्य अनावरण..!
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-रिक्षाचालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या दैनंदिन अडचणींना त्वरित न्याय मिळावा, या उद्देशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र (प्रणीत) RPM ऑटो रिक्षा युनियनने त्रिमूर्ती चौक येथील नवीन रिक्षा स्टँडचे उत्साहात अनावरण केले. जवाहर कॉलनी परिसरात आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर रिक्षाचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते.या शाखेचे अनावरण RPM युनियनचे संस्थापक राजुभाई साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अँड.अविनाश थिट्टे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात,मराठवाडा संघटक साहेबराव जाधव,जिल्हा प्रमुख दिनेश गवळे,जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती,शहराध्यक्ष रणजीत मनोरे,तसेच जयनाथ बोर्डे,प्रकाश घोरपडे,राजकुमार अमोलिक,झहीर शेख,विजय सदावर्ते,भिमराव गाडेकर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे नेतृत्व ऑटो रिक्षा युनियन शहराध्यक्ष प्रदीप धनेधर यांनी केले.
त्रिमूर्ती चौक रिक्षा स्टँड युनियनचे नवे पदाधिकारी पुढीलप्रमाणे निवडण्यात आले
अध्यक्ष: गणेश दाभाडे
उपाध्यक्ष: अनिल कुलकर्णी
सचिव: दिनेश साळवे
कोषाध्यक्ष: लहू बनसोडे
सदस्य: मंगेश हिवराळे, धीरज खापर्डे, संजय पवार, अनिल प्रधान, वाल्मीक लोखंडे, दिलीप जाधव, सुभाष बहीरे, संतोष साळवे, विजय दाभाडे, चंद्रशेखर खोचरे, रमेश पिसे
“रिक्षाचालकांचं कल्याण हाच आमचा श्वास” युनियन अध्यक्ष
अनावरण कार्यक्रमात बोलताना युनियनचे पदाधिकारी म्हणाले,“त्रिमूर्ती चौकातील ही नवीन शाखा रिक्षाचालकांसाठी अत्यंत सोयीची ठरणार आहे. युनियनचे कार्य अधिक जलद आणि प्रभावीपणे होईल. चालक बांधवांच्या समस्या सोडवून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे भविष्य सुरक्षित करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.”
