तालुक्यातील तिन्ही गावं बिबट्याच्या दहशतीतच..खारे कर्जुनेची जखम ताजी असतानाच…निंबळक इसळक हादरलं..! लहान राजवीरवर बिबट्याची झडप
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुक्यातील खारे कर्जुने येथील पाच वर्षीय चिमुरडीचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा बिबट्याने निंबळक-इसळक येथील कोतकर वस्तीवर सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास लहान मुलगा राजवीर कोतकर (वय ८ वर्ष) घराबाहेर खेळत असताना अचानक त्याच्यावर हल्ला केला.सुत्रांच्या माहितीनुसार,बिबट्याने राजवीर वर हल्ला करताना त्याच्या खांद्याला चावा घेतला आहे. मुलाचे आई-वडील व गावकरी धाऊन आले आणि आणि बिबट्याचा हल्ला थांबवण्यात यशस्वी झाले.

राजवीरला तात्काळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे पण स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.घटनेनंतर (स्थानिक वनविभाग) ने गावातील जंगलवस्ती परिसरात गस्त वाढविली असून,आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आजच आपत्कालीन बैठकीची घोषणा केली आहे. परंतु घडलेल्या या प्रकारामुळे हे तीन्ही गाव दहशतीच्या सावटाखाली खाली आलेले दिसत आहे.
