तोफखाना पोलिसांची धडाकेबाज कारवाई..!३ लाख ८० हजारांच्या ७ चोरलेल्या दुचाकी हस्तगत..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-तोफखाना पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोटारसायकल प्रकरणातील मोठा गुन्हा उघडकीस आणत तब्बल ३ लाख ८०,००० रु.किमतीच्या ७ दुचाकी हस्तगत करत एकाला अटक केली आहे. तोफखाना पोलिस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई हद्दीत कुष्ठधाम रोडवरील चिंचेच्या झाडाखाली पार पडली.गेल्या काही महिन्यांपासून शहर परिसरात दुचाकी चोरीची वारंवार तक्रारी समोर येत होत्या.त्यावर नियंत्रण आणण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने विशेष मोहिम राबवून तपासाला गती दिली.
त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहितीचा वापर आणि सातत्यपूर्ण शोधमोहीम यांच्याद्वारे एका संशयिताला ताब्यात घेतले. दीपक भागवत वैरागर असे पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.चौकशीत त्याने विविध भागातून मोटारसायकली लांबविल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल ७ मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची किंमत सुमारे तीन लाख ८० हजार रुपये इतकी आहे.जप्त करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये होंडा,स्प्लेंडर,हिरो, बजाज अशा कंपन्यांच्या विविध मॉडेल्सचा समावेश आहे.सदरील कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबरमे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तोफखाना निरीक्षक जगदीश भांबळ, गणेशोत पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार सुनील चव्हाण,नितीन उगलमुगले,भानुदास खेडकर योगेश चव्हाण,रियाज इनामदार सुरज वाबळे,सुधीर खाडे,सुमित गवळी,अविनाश बर्डे,सुजय हिवाळे,सतीश त्रिभुवन, बाळासाहेब भापसे, दादासाहेब रोहकले यांनी केली आहे.तोफखाना पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटना आळ्यात येण्यास निश्चितच मदत होणार आहे,असे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
