अहमदनगर प्रतिनिधी (दि.१७ फेब्रुवारी):-लाच मागणी गुन्हा अहवाल
▶️ *युनिट -* अहमदनगर
▶️ *तक्रारदार-* पुरुष वय- ६१, रा- देहरे, ता- नगर, जिल्हा- अहमदनगर.
▶️ *आरोपी* -एकनाथ पंडित निपसे, वय – ४२, वर्ष, पोलीस हवालदार, नेमणूक कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर.
▶️ *लाचेची मागणी-* ५०,०००/-₹
▶️ *लाचेची मागणी -* ता.१६/०२/२०२३
▶️ *लाचेचे कारण* -.तक्रारदार यांचे त्यांचे राहते गावी किराणा दुकान आहे. ते किराणा सामान व धान्य विक्री करतात तसेच गावातील काही लोक मुलांना शाळेत मिळालेला तांदूळ त्यांचे दुकानात आणुन विकतात. असा विकत घेतलेला तांदूळ ते नगर मार्केट यार्ड मधील एका व्यापा-याला विकतात. मागील तीन चार महिन्यांपूर्वी सदर व्यापारी याचे दुकानावर कोतवाली पोलिसांनी धाड टाकून त्यांचेकडे काळे बाजारातील तांदुळ मिळून आले म्हणून गुन्हा दाखल केला होता व त्यास अटक केली होती. अटके दरम्यान त्या व्यापा-याने तक्रारदार यांचे कडुन तांदूळ विकत घेतल्याचे सांगितले वरुन आरोपी लोकसेवक याने तक्रारदार व त्यांचे मुलास आज रोजी बोलावून घेतले व त्यांचे मुलास या गुन्ह्यांमध्ये आरोपी न करणेसाठी व अटक न करणे साठी ५०,०००/- ₹ ची मागणी केली अशा आशयाची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. सदर तक्रारीचे अनुषंगाने दिनांक १६/०२/२०२३ रोजी पोलीस स्टेशन कोतवाली येथे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचे कडे ₹ ५०,०००/-ची मागणी केली, दरम्यान आरोपी लोकसेवक यास तक्रारदार व पंच यांचे बाबत संशय आलेने, आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांना एका खोलीत नेऊन, दरवाजा बंद करून त्यांची अंगझडती घेतली असता त्यास तक्रारदार यांचे कपड्यांचे आतमध्ये लपविण्यात आलेले डिजिटल व्हाइस रेकॉर्डर मिळुन आले. ते व्हाइस रेकॉर्डर आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचेकडून बळजबरीने हिसकावून घेऊन पोलीस स्टेशन मधुन पळुन गेला आहे. आरोपी लोकसेवक याचा शोध घेतला असता तो मिळुन आला नाही, म्हणून त्यांचे विरुद्ध आज रोजी तक्रारदार यांचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन कोतवाली येथे लाचेची मागणी करणे, व्हाइस रेकॉर्डर बळजबरीने हिसकावून घेऊन जाऊन पुरावा नष्ट केला म्हणून दिनांक १७/०२/२०२३ रोजी ०२;५३ वाजता भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ व भारतीय दंड विधान कलम ३९२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद गोर्डे करीत आहेत.
▶️ *सापळा अधिकारी* शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.अहमदनगर
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी -* हरिष खेडकर ,पोलीस उपअधीक्षक, ला. प्र वि .अहमदनगर
▶️ *सापळा पथक** – पोलीस हवालदार संतोष शिंदे, पोना रमेश चौधरी, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड,वैभव पांढरे, चालक हारून शेख
▶ **मार्गदर्शक* -मा.शर्मिष्ठा वालावलकर- घारगे मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
▶मा. नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.
▶️ मा: नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶ **आरोपीचे सक्षम अधिकारी* – मा. पोलीस अधीक्षक,अहमदनगर
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
*@ टोल फ्रि क्रं. १०६४*
