अहमदनगर प्रतिनिधी(दि.१७ फेब्रुवारी):-वडगाव गुप्ता ते पिंपळगाव माळवी रोडवर बायपास चौकात गुरूवारी दि.१६ फेब्रुवारी रोजी रात्री टेम्पोमधून वाहतूक केली जात असलेली दोन लाख २५ हजार रूपयांची सुगंधी तंबाखू स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडली.चार लाखाचा टेम्पो व दोन लाख २५ हजाराची तंबाखू असा सहा लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस अंमलदार कमलेश पाथरूट ने.स्थानिक गुन्हे शाखा यांच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही इसम सुगंधी तंबाखूची वडगाव गुप्ता ते पिंपळगाव माळवी रोडने वाहतुक करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी त्यांच्या पथकाला माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने दोन पंचासमक्ष गुरूवारी रात्री बायपास चौकात सापळा लावला. संशयीत टेम्पो (एमएच 14 जीयू 3968) पथकाने पकडला.त्याची झडती घेतली असता त्यामध्ये १५ गोण्यात सुगंधी तंबाखू मिळून आली. पोलिसांनी सुगंधी तंबाखूसह टेम्पो ताब्यात घेतला.सदरची तंबाखू झाहीद खान यांची असल्याची माहिती समोर आली आहे.अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
