अहमदनगर प्रतिनिधी (दि.१६ फेब्रुवारी):-ख्रिश्चन धर्मगुरु, फादर्स व चर्चेसवर वारंवार होणारे हल्ले,त्यांच्यावर होणारे धर्मांतराचे खोटे आरोप लावुन विविध खोट्या गुन्हयांमध्ये अडकविणे,चर्चेसची मोडतोड करणे,प्रभु भोजनासारख्या धार्मिक विधींमध्ये व्यत्यय आणुन पवित्र विधीची विटंबना करणे.अशा घटना वारंवार घडत आहेत.सदर घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ख्रिस्ती समाजाच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि.१६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा.सकल ख्रिस्ती समाज निषेध मुक मोर्चा अहमदनगर च्यावतीने आयोजन करण्यात आला.जिल्हाभरातील सकल ख्रिस्ती बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.सदर मोर्चाची सुरुवात क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूल मैदान,स्टेशन रोड येथून मार्केटयार्ड चौक- बंगालचौकी-माणिक चौक – अर्बन बँक मार्गे,नवीपेठ नेता सुभाष चौक,तेलीखुंट चौक कापड बाजार मार्गे करबीवाला चौक भंडारी (जनरल स्टोअर्स) चौक जुने कलेक्टर ऑफिस येथे येऊन मा.जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन मोर्चाचा समारोप झाला.बिशप शमुवेल भिंगारदिवे म्हणाले की, ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय समाज असून समाजावर वारंवार होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ सदरचा मुकमोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यात आला आहे.यावेळी बिशप शरद गायकवाड,बिशप एम.एस. सावंत,बिशप शमूवेल भिंगारदिवे,मि.जॉन्सन शेस्कपिअर,बिशप तानाजी पाडळे,रेव्ह. दीपक पाडळे,प्रा.डॅनियल काळोखे,फादर ब्रिस्टन बिटटो,रेव्ह.पी.जि.मकासरे,रेव्ह.डॉ.जॉन प्रभाकर,रेव्ह.जे.आर.वाघमारे,रेव्ह.डि.डि. सोनावणे,रेव्ह.तेजपाल उजागरे,रेव्ह.ताराचंद चक्रनारायन,डॉ.जॉन उजागरे,मेजर देवदान कळकुंभे,ॲड.योहान मकासरे,ॲड.जे.डि. कुसमोडे,ॲड.जॉन खरात,प्रशांत पगारे,पा. सादिक,पा.योसेफ वैरागर, बबलू वाघमारे,किरण गायकवाड,सागर वडागळे,पा.विजय काकडे आदी उपस्थित होते.

