अहमदनगर प्रतिनिधी (दि.१६ फेब्रुवारी):-अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह चार पोलीस निरीक्षकाच्या बदल्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी केल्या आहेत.तसे आदेश त्यांनी काढले आहेत.बदली झालेल्या या पोलीस निरीक्षकांना शिवजयंती बंदोबस्तानंतर तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे.यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची जळगाव,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची नाशिक ग्रामीण,पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांची धुळे तर सुनील पाटील यांची नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे.