Crime..कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसावर भररस्त्यात हल्ला..! कायनेटीक चौकात दुचाकीस्वाराची दादागिरी
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- शहरातील कायनेटीक चौकात कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसावर दुचाकीस्वाराने हात उचलल्याची धक्कादायक घटना १ मार्च रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार गणेश मोहन शिंदे हे कायनेटीक चौकात वाहतूक नियमन करत होते.दोन दुचाकीस्वार रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून वाद घालत होते, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असताना आरोपीने पोलिसांशी हुज्जत घातली.
आरोपी अजित बाळासाहेब भोगाडे (वय २२, रा. साकत बु., ता. आष्टी, जि. बीड) याने हवालदार शिंदे यांची गचांडी धरून शिवीगाळ व मारहाण केली.परिसरात एकच खळबळ उडाली.सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.भररस्त्यात पोलिसावर झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
