Crime..गोरक्षकांना चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना..! LCB ने आवळल्या दोघांचा मुसक्या तिघे पसार
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गायींची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून टेम्पोचा पाठलाग करणाऱ्या गोरक्षकांच्या मोटारसायकलला आयशर टेम्पो व क्रेटा कारने पाठीमागून जोराची धडक देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली होती.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दोन आरोपींना जेरबंद केले असून गुन्ह्यात वापरलेली चार लाख रुपये किंमतीची क्रेटा कार जप्त केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,दि. 8 मार्च 2026 रोजी फिर्यादी संकेत सोमनाथ हराळे (रा.चांदा ता. नेवासा जि.अहिल्यानगर) व त्याचा मित्र सार्थक केळगेंद्र हे दोघे मोटारसायकलवरून जात असताना आयशर टेम्पोमध्ये गायींची वाहतूक होत असल्याचा संशय त्यांना आला.त्यानंतर त्यांनी त्या टेम्पोचा ओव्हरटेक करून पाठलाग सुरू केला.
दरम्यान घोडेगाव शिवारातील भारभोडी पुलाजवळ आयशर टेम्पो व क्रेटा कारने मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक देत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी संकेत हराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गु.र.नं. 87/2026 भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 110 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले.त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वाखाली शाहिद शेख,गणेश धोत्रे, सोमनाथ झांबरे,विष्णू भागवत, सतीश भवर,बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे तसेच चालक महादेव भांड यांचे पथक तयार करण्यात आले.तपासा दरम्यान दि.10 मार्च 2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,क्रेटा गाडी क्रमांक MH.16.DC.9286 मधून फैजान अय्याश शेख (वय 24) हा त्याच्या साथीदारांसह अहिल्यानगरच्या दिशेने येत आहे.त्यानुसार पोलिसांनी गजराज नगर चौक येथे सापळा रचून क्रेटा कार थांबवली.
गाडीतून फैजान अय्याश शेख (वय 24) व बबलू उर्फ असिम नजीर अहमद शेख (वय 30) दोघेही रा.बायजाबाई जेऊर ता. जि.अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले.चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत अनिष इलियास कुरेशी (फरार), दानीश जाकीर शेख/कुरेशी (फरार) तसेच आयशरचा चालक शरीफ (रा. सुरत, फरार) यांचा या घटनेत सहभाग असल्याचे सांगितले.पोलिसांनी आरोपींकडून 4 लाख रुपये किंमतीची क्रेटा कार जप्त केली असून ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासासाठी सोनई पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
