“आंबेडकरी जल्लोषाची तयारी..! शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ ९ एप्रिलला भव्य भीमगीतांचा महासंगीत सोहळा सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा जंगी कार्यक्रम”
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भारतरत्न DR.B.R.Ambedkar यांच्या जयंती निमित्त अहिल्यानगर शहरात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग तसेच मनपा नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे मित्र परिवार यांच्या वतीने ९ एप्रिल २०२६ रोजी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आंबेडकरी चळवळीचे ख्यातनाम गायक Anand Shinde यांचा भव्य भीमगीतांचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजकांनी मुंबई येथे जाऊन गायक आनंद शिंदे यांची भेट घेतली व त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.आनंद शिंदे यांच्या आवाजातील भीमगीते आणि सामाजिक संदेशामुळे हा कार्यक्रम शहरातील आंबेडकरी समाजासाठी एक विशेष आकर्षण ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.या भेटीदरम्यान मनपा नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे, पीआरपी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड,युवा नेते पप्पू भाऊ पाटील,युवा नेते सिद्धार्थ आढाव, समीर भिंगारदिवे,संजय दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे या सांस्कृतिक सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.दरवर्षी प्रमाणे यंदाही डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात विविध सामाजिक,सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.यंदाच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित भीमगीतांच्या जंगी कार्यक्रमामुळे शहरातील आंबेडकरी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
