कत्तलीचा प्रयत्न फसला..कोतवाली पोलिसांनी इनोव्हा कारसह आरोपीस जेरबंद करत जनावरांची केली सुटका..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कत्तल करण्याच्या उद्देशाने इनोव्हा कारमधून गोवंशीय जनावरे वाहतूक करणाऱ्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी वाहनासह जेरबंद केले.ही कारवाई दि.१३ मार्च २०२६ रोजी कोतवाली पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केली.

कोतवाली पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील व तपास पथकाचे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील व्यापारी मोहल्ला झेंडीगेट परिसरात एक इसम इनोव्हा कारमधून गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी घेऊन येत आहे.ही माहिती मिळताच पोनि. संभाजी गायकवाड यांनी पुढील कारवाईचे आदेश दिले.त्यानुसार पोउपनि.प्रवीण पाटील व तपास पथकातील अंमलदार मपोहेकॉ/रोहिणी दरंदले, पोहेकॉ.साबीर शेख,शिरीष तरटे,रमेश शिंदे यांनी व्यापारी मोहल्ला झेंडीगेट परिसरात जाऊन सापळा रचला.
दरम्यान एक ग्रे रंगाची इनोव्हा कार संशयास्पदरीत्या दिसून आली.पोलिसांनी कार अडवून त्यातील चालकास नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव इरफान हनीफ कुरेशी (वय ३१ वर्षे,रा.व्यापारी मोहल्ला, झेंडिगेट,ता.जि.अहिल्यानगर) असे सांगितले.यानंतर पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये ३ गोवंशीय जातीची जनावरे आढळून आली. त्याबाबत विचारपूस केली असता आरोपीने ती जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली.त्यानंतर आरोपीस ताब्यात घेऊन कोतवाली पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे नगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख,मपोहेकॉ.रोहिणी दरंदले,संतोष बनकर,बाळकृष्ण दौंड,विशाल दळवी,विनोद बोरगे,राहुल शिंदे,साबीर शेख,अविनाश वाघचौरे,दीपक रोहकले,रमेश शिंदे,शिरीष तरटे,अमोल गाडे,अभय कदम,दत्तात्रय कोतकर,सुरज कदम,अतुल काजळे,महेश पवार,अतुल लाटे,राम हंडाळ,सुधाकर पाटोळे,मपोकॉ. पल्लवी रोहले,तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंड यांनी केली आहे.
