मा.खासदार डॉ.सुजय विखे यांनी दिलेला शब्द पाळला.. होमगार्डचे ७ लाख मानधन केले स्वतःहून जमा..नगर-मनमाड महामार्गावरील कोंडीला आता ब्रेक
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-समाजातील प्रश्नांवर केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृतीतून दिलेला शब्द पाळण्याची परंपरा जपणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा आपली बांधिलकी सिद्ध केली आहे. नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढताना त्यांनी होमगार्डचे तब्बल सुमारे ७ लाख रुपयांचे मानधन स्वतःच्या पुढाकारातून जमा करून दिलेला शब्द खरा ठरवला आहे.या निर्णयामुळे राहुरी परिसरातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून, वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत झाली आहे.
🚨 कोंडी,अपघात आणि नागरिकांची चिंता
नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी वाहतूक एकेरी करण्यात आली होती, तर काही ठिकाणी डायव्हर्शन देण्यात आले होते. परिणामी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती.अपघातांचे प्रमाण वाढल्याने नागरिक,व्यापारी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
👀 प्रत्यक्ष पाहणी, तातडीचा निर्णय
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. सुजय विखे पाटील यांनी जानेवारी महिन्यात स्वतः घटनास्थळी भेट देत पाहणी केली.नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांनी तातडीने उपाययोजना करत वाहतूक नियंत्रणासाठी होमगार्ड नेमण्याचा निर्णय घेतला.शासनाकडे मानधनाची तरतूद नसल्यास ते स्वतः देऊ, असा स्पष्ट शब्द त्यांनी दिला होता.
🤝 प्रशासनाची साथ, प्रभावी अंमलबजावणी
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या मागणीची तात्काळ दखल घेत प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानुसार:२० जानेवारी ते ३ फेब्रुवारी: १९ होमगार्ड ४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी:आणखी १९ होमगार्ड अशा एकूण ३९ होमगार्डनी वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.यामुळे कोंडी कमी झाली आणि अपघातांचे प्रमाणही घटले.
💰 ६.८८ लाखांचा धनादेश सुपूर्त होमगार्डचे प्रतिदिन १,२८३ रुपयांप्रमाणे एकूण ६,८८,१९७ रुपये इतके मानधन देय झाले होते.दिलेला शब्द पाळत अहिल्यानगर शहर भाजपा व विखे पाटील परिवार यांच्या वतीने सुमारे ७ लाख रुपयांचा धनादेश २४ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
👍 “आश्वासन नव्हे, कृती!” – नागरिकांची भावना
वाहतूक सुरळीत राहावी, अपघात टाळावेत आणि नागरिकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी घेतलेला हा निर्णय सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला आहे.डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण करून प्रत्यक्ष कृतीतून जनतेचा विश्वास जिंकला, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
🏁 समन्वयातून प्रश्न सुटतो!
नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक समस्येवर प्रभावी उपाय करत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून मोठे प्रश्नही सोडवता येतात, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
