Devgad Khandoba Yatra…चैत्र पौर्णिमा देवगड खंडोबा देवस्थान यात्रा उत्सवाचे भव्य आयोजन
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):- संगमनेर तालुक्यातील प्रती जेजुरी म्हणुन ओळख असलेल्या श्री.क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान चैत्र पौर्णिमा लहान यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार दि.०२ एप्रिल रोजी सकाळी ५ ते ६ श्रींचे मंगलस्नान,सकाळी ६ ते ७ काठी सजावट,सकाळी १० वा महापूजा व महाआरती संपन्न होणार आहे.विनायक पानसरे व तेजश्री पानसरे श्री.ऍग्रो एजन्सी दिल्ली नाका, संगमनेर आणि शिवनाथ सातपुते व अनिता सातपुते कलाश्री डेकोरेशन, सुकेवाडी यांच्या हस्ते महापूजा व महाआरती संपन्न होणार आहे.
देवगड देवस्थान ट्रस्ट खंडोबा मंदिरात चैत्र पौर्णिमा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.चैत्र शुद्ध पौर्णिमेला मार्तंड भैरवावतार धारण केल्याची आख्यायिका आहे.यात्रेनिमित्त भाविक ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ आणि भंडारा-खोबऱ्याची उधळण करत खंडेरायाचे दर्शन घेतात.या काळात गड भक्ती रसात न्हाऊन निघतो आणि भक्तांचा जल्लोष पाहायला मिळतो.भंडाऱ्याची उधळण यात्रेमध्ये ‘सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात भंडारा उधळला जातो.सदर यात्रा उत्सवात भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बाबासाहेब पावसे (अध्यक्ष),अनिल गडाख (सचिव),संतोष पावसे (उपाध्यक्ष),अण्णासाहेब शिंदे (खजिनदार),सोमनाथ पावसे (विश्वस्त),गणेश गडाख (विश्वस्त),मधुकर शिंदे (विश्वस्त),विकास पावसे (विश्वस्त),अमिरत येरमल (विश्वस्त) मोठे भाऊ बडे (विश्वस्त) काशिनाथ पावसे(विश्वस्त), चंद्रशेखर गडाख (विश्वस्त) उत्तम जाधव (विश्वस्त)यांच्या सह श्री.क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ हिवरगाव पावसा यांनी केले आहे.
