अहमदनगर प्रतिनिधी (दि.२५ प्रतिनिधी):-अहमदनगर महापालिकेतील स्थायी समिती सभापती कुमार वाकळे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले असून या पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जाहीर केला आहे.त्यानुसार २ मार्चला सकाळी ११ वाजता मतदान होईल.निवडणूक कार्यक्रम २८ फेब्रुवारीपासून १ मार्चपर्यंत सकाळी ११ ते दुपारी दीड या वेळेत महापालिकेतील नगर सचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज मिळणार आहेत.२ मार्चला स्थायी समितीची विशेष सभा बोलविण्यात आलेली आहे.२ मार्चलाच अर्ज छाननी व अर्ज माघारी प्रक्रिया होईल.त्याच दिवशी सकाळी ११ वाजता निवडणूक होईल,अशी माहिती अहमदनगर महापालिकेतील नगर सचिव एस.बी.तडवी यांनी दिली.
