अहमदनगर प्रतिनिधी(दि.२५ फेब्रुवारी):-कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार यांनी यांनी २५ फेब्रुवारी रोजी पहाटे 5,30 वाजता रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना अपमानास्पद वागणूक व शिवीगाळ केले बाबत जिल्हा शासकीय रुग्णालयात आज सर्व कर्मचारी संघटना व लिपिक हक्क परिषद तसेच मध्यवर्ती संघटना यांचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी यांनी सकाळी ११ वाजता या घटनेचा निषेध व्यक्त केला.व या संबंधित गैरवर्तन करणाऱ्या तहसीलदारावर कारवाईची मागणी केली कारवाई न झाल्यास दि.२७ फेब्रुवारीपासून सर्व कर्मचारी काम बंद करणार असल्याचे यावेळी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले.यावेळी डॉ.मनोज घुगे,डॉ.कराळे,डॉ.देशमुख,डॉ.प्रसाद सायगावकर,छाया जाधव,परिचारिका संघटनेचे अध्यक्ष सुरेखा आंधळे,इंदिरा दुलगज,नारायण पवार,काळदाते,गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
