पाथर्डी प्रतिनिधी (दि.२६ फेब्रुवारी):-शहरातील सराफ बंडूशेठ उर्फ राजेंद्र चिंतामणी यांना अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून लुटल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी जलदगतीने तपास करून आरोपी विशाल शिवाजी एडके रा.पाथर्डी, दीपक दत्तात्रय राख रा.केडगाव,दीपक तोताराम सोमनकर रा.राघू हिवरे या तीन चोरट्यांना गजाआड केले आहे.बंडूशेठ चिंतामणी हे गुरुवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे त्यांचे सोन्याचे दुकान बंद करून घरी निघाले असता त्यांचा शेवगाव रोड लगत असलेल्या ओढ्या जवळ अज्ञात चोरट्यांनी दुचाकी गाडी अडवून त्यांच्या कडील पिशवी हिसकावली त्यावेळी सुवर्णकार चिंतामणी यांनी त्यास विरोध केला असता अध्यात चोरट्यांनी त्यांच्याकडील धारदार हत्यारांनी चिंतामणी त्यांच्या डोक्यावर वार केल्याने शहरात घबराटीचे वातावरण पसरले होते तसेच या हल्ल्याचा निषेध करत शुक्रवारी शहरातून पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली होती.त्यानुसार पाथर्डी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,रामेश्वर कायंदे,पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर,पोना/राम सोनवणे,श्रीकांत डांगे,पोकॉ/ भगवान सानप,निलेश म्हस्के,संदीप गर्जे,देविदास तांदळे,अतुल शेळके,राहुल निमसे,राहुल तिकोने,संदीप कानडे,,ईश्वर बेरड,लक्ष्मण पवार,ज्ञानेश्वर रसाळ,संदीप बडे आदीनी तपास करून सर्व आरोपींना पकडले.
