अहमदनगर प्रतिनिधी (दि.२६ फेब्रुवारी):-महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी मंगळवारी दि.२८ फेब्रुवारी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि आयोगाच्या सदस्या या स्वत:तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. यानंतर अध्यक्ष रुपाली चाकणकर अहमदनगर जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत.यावेळी जिल्हाधिकारी,कामगार आयुक्त,पोलीस अधीक्षक तसेच आरोग्य,परिवहन, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित असतील.महिलांना केले आवाहन उपरोक्त सर्व कार्यक्रम अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहेत.या जनसुनावणी वेळी पोलीस, प्रशासन,विधी सल्लागार, समुपदेशक,जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणी अधिकाधिक महिलांना पुढे येऊन,न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्या,असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी केले आहे.
