अहमदनगर प्रतिनिधी (दि.२६ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात शिराळ येथे रविवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे.शिराळ येथे पोपट लक्ष्मण घोरपडे वय वर्ष ५२ व हनुमंत घोरपडे यांच्यात जमिनीच्या वादातून दुर्गामाता मंदिराजवळ आज एक वाजण्याच्या सुमारास वाद झाला त्यानंतर झालेल्या हाणामारीत पोपट घोरपडे यांना पायाला व हाताला जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.खून झाल्याची घटना समजताच शेवगाव पाथर्डीचे डीवायएसपी अनिल कातकाडे व पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी आले.
