खाकीचा दणका..! अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांचे धाबे दणाणले..एकाच दिवसात १० ठिकाणी छापे..LCB कडून ७ दारू विक्रेते आणि जुगार अड्ड्यांचा पर्दाफाश
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आक्रमक पवित्रा घेतला असून,बुधवारी (१३ मे) रोजी जिल्ह्याच्या विविध भागांत धडक कारवाई केली.पाच स्वतंत्र पथके तयार करून केलेल्या या कारवाईत ७ अवैध दारू विक्रेते आणि ३ जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले.या धाडसत्रात पोलिसांनी एकूण २,६६,७१५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून,गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीगोंदा,खर्डा, जामखेड,एमआयडीसी, तोफखाना आणि संगमनेर शहर परिसरात ही मोठी कारवाई केली.यामध्ये दारू विक्रीसह मोठ्या जुगार अड्ड्यांचाही समावेश आहे. संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी सर्वाधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.अवैध धंदेचालवणाऱ्यां विरुद्ध यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
