गुन्हेगारांचा कर्दनकाळ राकेश ओला साहेब आता अमरावतीचे पोलिस आयुक्त..जिल्ह्यातील ‘खाकीतला एकमेव देवदूत’!
विशेष (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस दलाचा चेहरामोहरा बदलणारे, सर्वसामान्यांचे कैवारी आणि गुन्हेगारी विश्वाचा थरकाप उडवणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांची पदोन्नतीने पोलीस आयुक्त, अमरावती येथे बदली झाली आहे.या बातमीने एका बाजूला त्यांच्या प्रगतीचा आनंद व्यक्त होत असला,तरी जिल्ह्याने एक कार्यक्षम आणि हळव्या मनाचा लोकप्रतिनिधी गमावल्याची भावना नागरिकांमध्ये दाटून आली आहे.राकेश ओला साहेबांनी जेव्हा अहिल्यानगर जिल्ह्याचा पदभार स्वीकारला, तेव्हा जिल्ह्यासमोर अनेक आव्हाने होती. मात्र,आपल्या शांत पण तितक्याच आक्रमक कार्यशैलीने त्यांनी अवघ्या काही काळातच गुन्हेगारांवर वचक निर्माण केला.टोळ्या करून दहशत माजवणाऱ्या गुंडांवर त्यांनी ‘मोक्का’ अंतर्गत धडक कारवाया केल्या.जिल्ह्यात वर्षानुवर्षे चालणाऱ्या जुगार, वाळू तस्करी आणि अवैध दारू धंद्यांवर त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करत थेट मुळावर घाव घातला.घरफोड्या,दरोडे आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून त्यांनी जिल्ह्याला सुरक्षिततेची खात्री दिली. केवळ गुन्हेगारांवर वचकच नाही,तर राकेश ओला साहेब हे सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरले. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराला न्याय मिळेल,याची खात्री त्यांच्या कार्यकाळात मिळत होती.
सामान्यांच्या अडीअडचणी थेट ऐकून घेणे.महिला आणि वृद्धांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे.पोलीस दलात शिस्त लावून खाकीबद्दलचा आदर वाढवणे.या त्यांच्या गुणांमुळेच ते जिल्ह्याचे लाडके अधिकारी बनले.अहिल्यानगरमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवल्यानंतर आता राकेश ओला साहेब अमरावती शहराचे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतील.अमरावती सारख्या मोठ्या शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान ते तितक्याच समर्थपणे पेलतील, यात शंका नाही.
