रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचा महत्त्वपूर्ण निर्णय…सुरेश कांबळे यांची ह्युमन पॉवर माथाडी युनियन’ च्या जिल्हाध्यक्षपदी निवड..कामगारांच्या प्रश्नांना मिळणार आता न्याय!
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-शहरातील प्रमुख व्यावसायिक केंद्र असलेल्या कॅनॉट पॅलेस भागात ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र’ प्रणित ‘ह्युमन पॉवर माथाडी जनरल कामगार युनियन’ची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच उत्साहात पार पडली.या बैठकीत युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. युनियनचे मुख्य नेते राजुभाई साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
बैठकीच्या सुरुवातीला रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाचे जिल्हाप्रमुख दिनेश गवळे यांनी प्रास्ताविक करून युनियनच्या आगामी वाटचालीची रूपरेषा मांडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष संजय जाधव यांनी केले,तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती यांनी मानले.या निवडीच्या वेळी पक्षातील आणि युनियनमधील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यामध्ये:राज्य पातळीवरील नेते: राज्य उपाध्यक्ष अॅड.अविनाश थिट्टे,राज्य सचिव सुरेश शिनगारे, राज्य सहसचिव वैभव लोखंडे.मराठवाडा पदाधिकारी: मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, मराठवाडा कार्याध्यक्ष सचिन नवगिरे.जिल्हा व शहर पदाधिकारी: शहराध्यक्ष रणजीत मनोरे, जिल्हा सचिव रवी मोरे, कामगार युनियनचे शहराध्यक्ष संतोष उनवणे, मध्य शहराध्यक्ष सिद्धार्थ बोर्डे, पूर्व शहराध्यक्ष राहुल खरात इत्यादी उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे, राजकुमार अमोलिक, अनिस गंगापुरकर, भिमराव गाडेकर, सतीश प्रधान, अशोक तुपे, शेख फईम, अनिल पोतदार, कुणाल खरात, तुषार गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, राहुल शिंदे, सुनील वाहूळ, विजय सोनवणे, गणेश बोर्डे आणि राजकुमार साळवे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
कामगारांच्या प्रश्नांना आता न्याय मिळणार!
सुरेश कांबळे यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील माथाडी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. कांबळे यांच्या आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्वाखाली जिल्ह्यातील माथाडी कामगारांचे रखडलेले प्रश्न आणि न्याय्य हक्क प्रभावीपणे सुटतील, असा ठाम विश्वास यावेळी सर्वच नेत्यांनी व कामगारांनी व्यक्त केला आहे.
