महिलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट..विकृत प्रवृत्तीला कायद्याचा दणका..! रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा मानसीताई म्हस्के यांच्या तक्रारीनंतर समाजकंटक विलास काकडेवर सिडको पोलिसांत ‘एफआयआर’!
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-सोशल मीडियाचा गैरवापर करून बौद्ध समाजाच्या महिलांविषयी अत्यंत अश्लील, विकृत आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विलास काकडे (रा. मिसरवाडी,छत्रपती संभाजीनगर) या समाजकंटकाविरोधात सिडको एन-७ पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या महिला आघाडीने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत हा गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,संशयित आरोपी विलास काकडे (मो.क्र. ७३५०८१४१२१) याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारी अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
या कृत्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत होता.या भामट्याला कायद्याचा हिसका दाखवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मानसीताई म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सिडको एन-७ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांची भेट घेतली.महिलांच्या प्रतिष्ठेशी खेळणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत मानसीताई म्हस्के यांनी अधिकृत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विलास काकडे विरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.यावेळी गुन्हा दाखल करताना पक्षाचे जिल्हाप्रमुख दिनेश गवळे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात,जिल्हा सचिव रवी मोरे, कामगार आघाडीचे शहराध्यक्ष संतोष उनवणे,पूर्व शहराध्यक्ष राहुल खरात,सुनील वाहूळ,मध्य शहराध्यक्ष सिद्धार्थ बोर्डे आणि प्रकाश घोरपडे यांच्यासह पक्षाचे इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
