महापुरुषांचा फेसबुकवर अवमान करणाऱ्या विकृत प्रवृत्तीला चाप!पारनेरमध्ये त्या डॉक्टरवर ‘BNS’ अंतर्गत गुन्हा दाखल..!वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक पवित्रा वैद्यकीय सनद रद्द करण्याची मागणी
पारनेर/भाळवणी (विशेष प्रतिनिधी):-सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि समाजात धार्मिक व जातीय द्वेष निर्माण करणारा मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात एका डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वंचित बहुजन आघाडीचे पारनेर युवक तालुकाध्यक्ष संकेत विनायक पटेकर यांनी या प्रकरणी पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली आहे.या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आणि विशेषतःपारनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी डॉ.मंगेश दत्तात्रय बेकारसे (मूळ रा. खारेकर्जुने,ता.जि. अहिल्यानगर) हा वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने भाळवणी (ता.पारनेर) येथे वास्तव्यास आहे.आरोपीने त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक योगदानाविषयी, त्यांच्या लंडन येथील घराविषयी आणि त्यांच्या वकिली व्यवसायाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तसेच,”इतिहास वाचा म्हणजे समजेल, अन् आमचे हिंदू पण मूर्ख आहेत…” अशा प्रकारच्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कमेंट्स करून सामाजिक व धार्मिक सलोखा बिघडवण्याचा कुत्सित प्रयत्न केला होता.२१ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.
महापुरुषाचा बुद्धिपुरस्सर अवमान झाल्याची माहिती मिळताच भाळवणी परिसरातील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचा संयम सुटला.पोलिसांनी अधिकृत गुन्हा नोंदवण्याच्या एक दिवस अगोदरच,संतप्त झालेल्या भाळवणी गावातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत आरोपी डॉ.मंगेश बेकारसे याला गाठले. लोकभावनांचा अनादर करणाऱ्या या आरोपीच्या कृत्याचा तीव्र निषेध करत कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळे फासले आणि त्याला चपलांचा हार घातला.या आक्रमक पवित्र्यामुळे पारनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब पातारे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली ही कायदेशीर लढाई लढली जात आहे.युवक तालुकाध्यक्ष संकेत पटेकर यांनी पारनेर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलली.पारनेर पोलीस ठाण्याचे एपीआय (API) नितीन खंडागळे यांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.या कायदेशीर लढाईत सर्वपक्षीय आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची एकजूट पाहायला मिळाली. पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून घेण्यासाठी सामाजिक नेतृत्व राजेंद्र करंदीकर, आरपीआय (RPI) पारनेर तालुका युवक अध्यक्ष प्रदीप नगरे,तसेच गौतम पटेकर,निलेश पटेकर,संभाजी पटेकर,विशाल पटेकर,भागा सोनवणे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सर्वपक्षीय रेट्यामुळे पारनेर पोलिसांनी आरोपी डॉ.मंगेश बेकारसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २९९ (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने केलेले कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अनिल हरिभाऊ देवकर (बक्कल नंबर ६७५) या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.”महापुरुषांबद्दल सोशल मीडियावर गरळ ओकून समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तीला समाजात स्थान नाही.डॉ.मंगेश बेकारसे याच्यावर केवळ पोलीस कारवाई करून आम्ही थांबणार नाही, तर त्याच्या डॉक्टरी व्यवसायाची सनद (License) कायमची रद्द करण्यात यावी,यासाठी मेडिकल काउन्सिल आणि संबंधित प्रशासनाकडे वंचित बहुजन आघाडी व इतर मित्र संघटनांच्या वतीने तीव्र लढा दिला जाईल,” असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
