निघोज-आळकुटी गट मनसे तालुका उपाध्यक्षपदी प्रवीण कोठावळे तरुणांचा धडाक्यात पक्षप्रवेश..!पारनेर तालुक्यात राज ठाकरेंच्या विचारांचे ‘इंजिन’ सुसाट!
सुपा (प्रतिनिधी):-महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या धोरणांवर विश्वास ठेवून पारनेर तालुक्यात मनसेचा आलेख वेगाने उंचावत आहे.अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख नयन कदम यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली,पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांच्या हस्ते सुपा येथे मनसेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.यात निघोज-आळकुटी गट तालुका उपाध्यक्षपदी प्रवीण सुभाष कोठावळे यांची,तर निघोज शाखाध्यक्षपदी अमोल शंकर ढवण आणि नारायणगव्हाण शाखा उपाध्यक्षपदी सूरज सुखदेव गोरे यांची निवड करण्यात आली आहे.माजी जिल्हा उपाध्यक्ष पप्पू लामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली निघोज येथील शेकडो तरुणांनी यावेळी मनसेचा झेंडा हाती घेतला.
यामध्ये साई दादा ढवण,संकेत ढवण,रवी फुलारे,शुभम ढवण, अक्षय मुळे,राम ढवण,अमोल दळवी,अभिजीत वाजे,अजिंक्य वाजे,प्रदीप कोठावळे,विशाल ढवण,श्रीकांत ढवळ,विकास ढवण,संतोष ढवण,योगेश ढवण, ऋतिक ढवण,सोन्या सोनवणे, अनिल थोरात,रघुनाथ मांडगे, सार्थक मांडगे,प्रकाश बांदल आदींचा समावेश आहे. यावेळी मनसेचे तालुकाप्रमुख अविनाश पवार म्हणाले की,शेतमालाचे पडलेले भाव,वाढता उत्पादन खर्च आणि महागाई यामुळे जनतेचा सत्ताधाऱ्यांवरून विश्वास उडाला आहे.पारनेर तालुक्यात केवळ मनसेच जनतेच्या प्रश्नांवर प्रखर विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवत आहे.म्हणूनच राजसाहेबांच्या विचारांकडे आकर्षित होऊन तरुण मोठ्या संख्येने पक्षात येत आहेत.या पक्षप्रवेशा वेळी तालुका सचिव नारायण नरवडे, तालुका उपाध्यक्ष वीरेंद्र थोरात, सुपा शहराध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, पारनेर शहराध्यक्ष सतीश म्हस्के आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तालुक्यात मनसेची ताकद वाढल्याने सर्वच स्तरातून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
