माता रमाईंच्या स्मृतीदिनानिमित्त भिंगारमध्ये वैचारिक प्रबोधन..अंधश्रद्धेमुळे बहुजन समाजाची दुर्गती विज्ञानाची कास धरल्याशिवाय विकास अशक्य केंद्रीय शिक्षक विजय हुसळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-“जोपर्यंत भारतातील बहुजन समाज अंधश्रद्धेतून बाहेर पडत नाही आणि विज्ञानाची कास धरत नाही,तोपर्यंत तळागाळातील अशिक्षित बहुजन समाज विकसित होणार नाही.श्रद्धा असावी,पण ती डोळस असावी.भगवान बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,शाहू महाराज आणि अण्णाभाऊ साठे यांच्या स्वातंत्र्य,समता, न्याय व बंधुता या तत्त्वांवरच आपली श्रद्धा असायला हवी,” असे परखड प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कोषाध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक आदरणीय विजय हुसळे सर यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर शहर शाखेच्या वतीने,माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, दि.११ जून २०२६ रोजी सिद्धार्थ बुद्ध विहार (सदर बाजार,भिंगार) येथे विशेष ‘अंधश्रद्धा निर्मूलन शिबिरा’ चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून हुसळे सर बोलत होते. त्यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा, राशीभविष्य,महिलांची होणारी फसवणूक आणि भगवान बुद्धांनी सांगितलेला पंचशीलेचा मार्ग या विषयांवर उदाहरणांसह अत्यंत सुंदर प्रबोधन केले.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भगवान बुद्धांच्या मूर्तीला पुष्प आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित केल्यानंतर सरचिटणीस लक्ष्मण माघाडे यांनी उपस्थितांकडून त्रिसरण पंचशील सामुदायिकरित्या घेतले.प्रास्ताविक संरक्षण उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी केले,तर केंद्रीय शिक्षक प्रकाश कांबळे,संरक्षण सचिव गोरख केदारे आणि समता सैनिक दलाचे मेजर बाळू कांबळे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.या शिबिरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड आणि विनायक सापा यांनी अंधश्रद्धेविषयी विविध धक्कादायक प्रयोग व प्रात्यक्षिके करून दाखवली.
तसेच अंनिसचे जात पंचायत विभागाचे अंधश्रद्धा निर्मूलन सचिव कारभारी गवळी यांनीही समाजात चालणाऱ्या गैरप्रथांवर प्रबोधन केले.याप्रसंगी केंद्रीय शिक्षक विजय हुसळे यांच्यासह विष्णू गायकवाड,संतोष गायकवाड, रवींद्र कांबळे,गोरख केदारे, प्रकाश कांबळे आणि मेजर बाळू कांबळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.यासोबतच भिंगार परिसरातील उपस्थित महिला व कार्यकर्त्यांचे स्वागत शहराध्यक्ष दीपक पाटोळे, सरचिटणीस लक्ष्मण माघाडे, युवराज बनसोड,मोहन शिरसाट,राजेंद्र पाडळे,विजय पाटोळे,बापू भिंगारदिवे, मिलिंद घाटेशाही,विजय कांबळे,संजय डहाणे आणि संतोष जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरात सदर बाजार परिसरातील प्रदीप कर्डक,शकुंतला पानपाटील,ओरे ताई, मथुराबाई कांबळे,शिला भिंगारदिवे,विमल घाटेशाही, शोभा आंग्रे,मंजुळा सूर्यवंशी, सरस्वती विघावे यांच्यासह ६२ शिबिरार्थी,महिला, युवक आणि बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या शेवटी ‘सरनंतय गाथा’ घेऊन शिबिराची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार शहराध्यक्ष दीपक पाटोळे यांनी मानले.
