हिवरगाव पावसा येथे हरित अभियानांतर्गत वृक्ष लागवड..मुख्याधिकारी अनंत भंडारी यांचे वृक्षदिंडीने स्वागत
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):- ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात वाढ होत चालली आहे. पावसाच्या पाण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. दुष्काळ पडत आहे .अनेक भागांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे. वाढते तापमानामुळे सजीव सृष्टीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.वाढते तापमानामुळे हिमनग वितळतात, हिमनद्या वितळतात त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होते. अनेक देश पाण्याच्या पातळी खाली जात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मालदीव सारख्या देश पाण्याखाली जाण्याचा मोठा धोका आहे. ग्लोबल वार्मिंगचा दुष्परिणाम त्यामुळे मान्सूनचा पाऊस लांबलेला आहे. पूर्वी सात जूनला सुरू होणारा मान्सूनचा पाऊस संततधार व सातत्यपूर्ण पडत असे. परंतु वर्तमान परिस्थितीत मान्सून कधी येईल याची शाश्वत अचूक अंदाज हवामान विभागाकडे नाही. या सर्वांवर एकाच उपाय म्हणजे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन होय. हरित
अहिल्यानगर अभियानांतर्गत संगमनेर तालुक्याने मोठा पुढाकार घेतला आहे.
संगमनेरात 770 हेक्टरवर वृक्षलागवड 14 ट्री या सामाजिक संस्थेने वृक्ष लागवडीसाठी योगदान देऊ केले आहे. त्यांनी संगमनेर तालुक्यात 770 हेक्टरवर वृक्ष लागवडीचे नियोजन केले असून, त्यासाठी खड्डे तसेच आवश्यक शेततळेही घेतली आहे. यात साकूरमध्येच 16 हजार झाडे लावण्याचा निर्धार केला आहे.हिवरगाव पावसा ग्रामस्थांच्या सहकार्याने 4000 वृक्ष लागवड हे कौतुकास्पद बाब आहे.या कामी ग्रामस्थांचा मोठा उत्साह,
प्रतिसाद मिळत असल्याच्या भावना जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आनंद भंडारी व्यक्त केले.
14 ट्रीज फाउंडेशन जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि हिवरगाव पावसा ग्रामपंचायत च्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड प्रकल्पाचे उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद चे मुख्य अधिकारी आनंद भंडारे यांच्या सह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत देवगड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या वृक्ष दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
वृक्षारोपण व पर्यटन विकास प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, गटविकास अधिकारी प्रविण सिनारे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, 14 ट्रीज फाउंडेशन चे व्यवस्थापक अनंत तायडे, आणि सहा.गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकुर, सरपंच तथा प्रशासक सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे,
ग्रामपंचायत अधिकारी गडाख, सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे,भाजपा जिल्हा पदाधिकारी काशिनाथ पावसे,वृक्षमित्र गणपत पावसे, भाजपा तालुका सरचिटणीस
गणेश दवंगे,केशव दवंगे, प्राध्यापक बाबुराव पावसे, देवगड माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक वसंत नेहे,माने एम ए, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे, कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव, कृषी विस्तार अधिकारी सचितानंद पावसे,शिक्षण विस्तार अधिकारी वलवे मॅडम, केंद्रप्रमुख स्मिता धनवटे,
शिक्षक संदीप पावसे,अक्षय खतोडे ,डॉ.रमेश पावसे,गोकुळ गडाख,बाळासाहेब भालेराव,
प्रवीण गडाख,सचिन आरगडे यांच्या सह सामाजिक,
राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होती.
