महिलांसाठी स्वावलंबनाची सुवर्णसंधी..! ‘आदिशक्ती महासंघा’ चा मोठा निर्णय..!कौशल्य विकास कोर्सेसद्वारे महिला व मुलींना मोफत रोजगाराची संधी..कराडातून उपक्रमाचा शुभारंभ!
कराड (प्रतिनिधी):-‘हातचे काम आणि हक्काचा रोजगार!” महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ‘आदिशक्ती महासंघ’ पुढे सरसावला आहे.कराड परिसरातील गरीब,गरजू आणि बेरोजगार महिला व मुलींसाठी विविध कौशल्य विकास कोर्सेस पूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आले आहेत.पारंपरिक कामांसोबतच आजच्या आधुनिक आणि तांत्रिक युगात महिलांना विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महिलांना विविध क्षेत्रांत पारंगत करण्यासाठी खालील कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाणार आहे
तांत्रिक व IT क्षेत्र🔹ऑटोमोबाईल व ड्रायव्हिंग🔹 सर्व्हिस व सेवा क्षेत्र
• AI ऑपरेटिंग अँड डेटा अॅनालिसिस• ई-रिक्षा चालक• पेट्रोल पंप अटेंडंट
• संगणक हार्डवेअर दुरुस्ती• ऑटोमोबाईल दुरुस्ती• सुरक्षा रक्षक
• इलेक्ट्रिशियन असिस्टंट• कार वॉशिंग• डिलिव्हरी सहाय्यक
• मशीन ऑपरेटर• महिला गवंडी काम• वेअरहाऊस अटेंडंट
• ब्युटी सर्व्हिसिंग
• जनरल ड्युटी असिस्टंट
💡 “स्वावलंबनाकडे एक पाऊल…सन्मानाने जगण्यासाठी कौशल्याची साथ!”
— आदिशक्ती महासंघ
📌 नाव नोंदणी कशी कराल?
इच्छुक महिला व मुलींनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपले नाव आणि संपर्क क्रमांक खालील क्रमांकावर त्वरित कळवावा. जागा मर्यादित असल्याने लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क प्रमुख: सविता काशिद
मोबाईल क्रमांक: 📞 9860186732
आयोजक:आदिशक्ती महासंघ
