Ahilyanagar..अवैध वाळू वाहतुकीवर LCB ची मोठी कारवाई तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी हद्दीत म्हसे फाटा येथे अचानक रचलेल्या सापळ्यात तब्बल ३५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत वाळूमाफियांचे कंबरडे मोडले आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना,गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की म्हसे गावच्या शिवारात ढंपरमधून वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे.मिळालेल्या पक्क्या बातमीच्या आधारे पोलिसांनी माळवाडी ते घोडनदी रोडवर म्हसे फाटा (ता.श्रीगोंदा) येथे तातडीने सापळा रचला.समोरून येणारा संशयास्पद ढंपर अडवून तपासणी केली असता त्यात अवैध वाळू आढळून आली. परवाना मागितला असता चालकाची बोलतीच बंद झाली.
ताब्यात घेतलेला आरोपी: दत्तात्रय नामदेव भवाळ (वय ३१, रा. ढोकराई, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर,फरार मुख्य सूत्रधार: संदीप खेडकर (रा. म्हसे,ता.श्रीगोंदा – ज्याच्या फायबर बोटीतून ही वाळू चोरून भरण्यात आली होती.याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९९/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शसंतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अतुल लोटके,विजय ठोंबरे,रणजीत जाधव,बाळासाहेब गुंजाळ, रमीजराजा आतार आणि भगवान थोरात यांनी केली आहे.
