अहिल्यानगर पोलिसांची मान उंचावली! एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व हवालदार राजू सुद्रिक यांच्या कर्तृत्वावर ‘अति-उत्कृष्ट सेवा पदका’ ची मोहोर
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पोलीस दलातील दीर्घकालीन,निष्कलंक आणि गुणवत्तापूर्ण सेवेचा गौरव करणाऱ्या अति-उत्कृष्ट सेवा पदक-२०२६ चा मान अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिवाजी थोरात आणि हवालदार राजू आप्पासाहेब सुद्रिक यांना मिळाला आहे.महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या प्रतिष्ठेच्या पदकांची घोषणा करण्यात आली आहे.कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा,शिस्त, कार्यतत्परता आणि उल्लेखनीय सेवाकार्याची दखल घेत सपोनी.हेमंत थोरात व हवालदार राजू सुद्रिक यांची या सन्मानासाठी निवड झाली आहे.त्यांच्या कामगिरीमुळे अहिल्यानगर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सपोनी.हेमंत थोरात यांनी यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केलेली आहे.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या हस्ते यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे या दोघांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून,त्यांच्या उल्लेखनीय सेवेमुळे पोलीस दलातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही उत्कृष्ट कामगिरीची प्रेरणा मिळणार आहे.
