अभिमानास्पद..! कर्तव्यनिष्ठ सेवेची पावती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अभिजीत दत्तात्रय अरकल यांना ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पोलीस दलातील दीर्घकालीन,निष्कलंक आणि गुणवत्तापूर्ण सेवेचा गौरव करणाऱ्या अति-उत्कृष्ट सेवा पदक-२०२६ चा मान अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अभिजीत दत्तात्रय अरकल यांना मिळाला आहे.महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या प्रतिष्ठेच्या पदकांची घोषणा करण्यात आली आहे.कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा,शिस्त, कार्यतत्परता आणि उल्लेखनीय सेवाकार्याची दखल घेत अभिजित अरकल यांची या सन्मानासाठी निवड झाली आहे.यापूर्वी सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना अरकल यांनी अनेक मोठे सायबर फ्रॉड उघडकीस आणले आहे त्यांच्या या प्रभावशाली कामगिरीमुळे अहिल्यानगर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या हस्ते यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे अरकल यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून,त्यांच्या उल्लेखनीय सेवेमुळे पोलीस दलातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही उत्कृष्ट कामगिरीची प्रेरणा मिळणार आहे.
