पवळा हिवरगावकर सभागृह सुविधांसाठी १० लाख निधी देणार आ.अमोल खताळ..कलावंतांची मानवंदना,विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी १५६ वी जयंती साजरी
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-“कलावंतांचा यथोचित सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी असून त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळवून देणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. आद्यनृत्यांगना नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या १५६ व्या जयंतीनिमित्त हिवरगाव पावसा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी त्यांनी पवळा भालेराव हिवरगावकर सामाजिक सभागृहाच्या पडवी, वॉल कंपाऊंड व इतर सुविधांसाठी आमदार निधीतून १० लाख रुपयांचा निधी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.तसेच,चालू वर्षापासून महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ कलावंताला ‘तमाशा सम्राज्ञी आद्यनृत्यांगना पवळा हिवरगावकर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार असून, हा भव्य पुरस्कार सोहळा हिवरगाव पावसा येथेच आयोजित केला जाईल, असा संकल्पही आ.खताळ यांनी व्यक्त केला.या सोहळ्यासाठी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
विविध सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक रंगत
कला सम्राज्ञी पवळा कला मंच आणि महात्मा फुले-डॉ. आंबेडकर-राजर्षी शाहू विचारमंचाच्या संयुक्त विद्यमाने या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते अभिवादनाने झाली. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.कवी व गायक हरिश्चंद्र भालेराव, शाहीर मधुकर भालेराव,शंकर भालेराव,यादव भालेराव, आणि राजेंद्र दारोळे यांनी सादर केलेल्या सुरेल लोकगीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रयोगात्मक लोककला नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात कुमार हर्षल गोफणे याच्या अप्रतिम लावणी नृत्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमात प्रमुख उपस्थित असलेले ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला.या सोहळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष तथा संस्थाध्यक्ष श्रीकांत भालेराव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ पावसे, गणेश दवंगे, केशव दवंगे, डॉ. प्रमोद पावसे, बाबासाहेब पावसे, विजय खरात, कैलास कासार, सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, रघुनाथ भालेराव, सोमनाथ भालेराव, संपादक यादवराव पावसे, अशोक भालेराव, पवळा यांचे पणतू व सचिव नितीनचंद्र भालेराव, दिनकर खरात, रामनाथ गडाख, भीम पावसे, मोठ्याभाऊ बडे, रंजना भालेराव, शैला भालेराव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब भालेराव, मन्सूर इनामदार, रोहिणी भालेराव, बाबासाहेब कदम, राजू दारोळे, गौरव दारोळे, विकास दारोळे, करण दारोळे, गणेश दारोळे, मानव भालेराव, पंकज भालेराव, सार्थक संगारे, नारायण मोकळ, सगान भालेराव आदींनी विशेष परिश्रम घेतले.
