मुंबई प्रतिनिधी (दि.४ मार्च):-भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशच्या महिला प्रदेश अध्यक्षा सौ.अल्काताई अनिलजी घाटे यांच्या भोई समाजाच्या सामाजिक कार्याची,तसेच महाराष्ट्र राज्य मच्छीमार कृती संघर्ष समितीच्या महिला प्रदेश अध्यक्षा या पदावर कार्यरत असताना केलेल्या मच्छीमारांच्या विकास कार्याची दखल घेत अलका ताई यांची भारतीय जनता पक्षाचे भटके विमुक्त आघाडी महिला प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली.महाराष्ट्रातील समस्त भटके विमुक्त समाजाला संघटीत करून त्यांचा विकास व्हावा या दृष्टीने भाजपाच्या भटके विमुक्त आघाडीच्या माध्यमातून राजकीय सामाजिक कार्याची वाटचाल सुरू करण्याच्या दृष्टीने प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची निवड झाली.भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत विविध सामाजिक घटकांचा विकास व्हावा या उद्देशाने अनेक आघाड्यांचे माध्यमातून विकास कार्य सुरू आहे.त्यापैकी एक म्हणजे भटके विमुक्त समाजाच्या विकासासाठी भाजप भटके विमुक्त आघाडी कार्यरत आहे.भटके विमुक्त आघाडी प्रदेश कार्यकारिणीचे मुख्य संयोजक तथा माजी आमदार श्री.नरेंद्रजी पवार व महिला आघाडी मुख्य संयोजक डॉ. सौ.उज्वलाताई हाके यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाचा कारभार सुरू असताना,भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशच्या महिला प्रदेश अध्यक्षा सौ.अल्काताई अनिलजी घाटे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अलकाताई घाटे यांची भारतीय जनता पक्षाचे भटके विमुक्त आघाडी महिला प्रदेश कार्यकारिणी मध्ये प्रदेश सचिव म्हणून आज कल्याण येथील भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशचे मुख्य संयोजक श्री.नरेंद्रजी पवार यांच्या हस्ते त्यांचा कार्यालयात सौ.अल्काताई घाटे यांना नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
