चिपळूणच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत कराडच्या ‘एच टू ओ’ क्लबचे १४ पदकांसह घवघवीत यश
कराड प्रतिनिधी (विजया माने):-चिपळूण येथे नगराध्यक्ष उमेश सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त १५ ऑगस्ट रोजी आयोजित भव्य ‘नगराध्यक्ष चषक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत’ कराडच्या जलतरणपटूंनी पदकांची लयलूट करत निर्विवाद वर्चस्व गाजवले.सांगली,मिरज, सातारा,पुणे,कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा विविध जिल्ह्यांतील ३०० हून अधिक नामांकित खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या अटीतटीच्या स्पर्धेत कराडच्या ‘एच टू ओ स्विमिंग क्लब’ (H2O Swimming Club) च्या खेळाडूंनी तब्बल १४ पदके पटकावून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला.
अविष्कार जगदाळे (सर्वाधिक ५ पदके):
१०० मीटर आयएम – रौप्य (द्वितीय)
५० मीटर फ्रीस्टाइल – रौप्य (द्वितीय)
५० मीटर बॅकस्ट्रोक – रौप्य (द्वितीय)
५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक – रौप्य (द्वितीय)
५० मीटर बटरफ्लाय – कांस्य (तृतीय)
रुद्रांश पाटील:
५० मीटर बटरफ्लाय – सुवर्णपदक (प्रथम)
अर्णव चव्हाण (३ पदके):
२०० मीटर आयएम – सुवर्णपदक (प्रथम)
२०० मीटर बॅकस्ट्रोक – कांस्य (तृतीय)
५० मीटर बटरफ्लाय – कांस्य (तृतीय)
आर्या योगेश साळवे (३ पदके):
५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक – रौप्य (द्वितीय)
५० मीटर बॅकस्ट्रोक – कांस्य (तृतीय)
५० मीटर फ्रीस्टाइल – कांस्य (तृतीय) उत्कृष्ट प्रशिक्षणाचे फळ या सर्व यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक ओंकार भुईंगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. एच टू ओ स्विमिंग क्लबमध्ये स्पर्धात्मक जलतरणासाठी चालवल्या जाणाऱ्या विशेष प्रशिक्षण बॅचेसमुळेच खेळाडूंना हे घवघवीत यश मिळवणे शक्य झाले.राज्य पातळीवर कराडचे नाव उंचावल्याबद्दल सर्व विजेत्या जलतरणपटूंचे पालक, क्रीडाप्रेमी आणि शहरभरातून सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
