‘ऑपरेशन गुटखा’! LCB च्या धडक धाडीत १४ जणांवर गुन्हे दाखल गुटखा माफियांचे धाबे दणाणले..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात बेकायदेशीर गुटखा आणि सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री करणाऱ्या माफियांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने जोरदार मोहीम उघडली आहे.जामखेड आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी टाकलेल्या चार मोठ्या धाडींमध्ये पोलिसांनी तब्बल १४ आरोपींवर गुन्हे नोंदवून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सक्त आदेश दिले होते.या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि/कृष्णकुमार सेदवाड यांच्यासह पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे,सुनिल मालणकर,भगवान थोरात,विशाल तनपुरे, गणेश लोंढे,बिरप्पा करमल,सतीष भवर,निळकंठ कारखेले,योगेश भिंगारदिवे,विजय ठोंबरे,संदिप पवार,गणेश धोत्रे,शाहीद शेख व अरविंद भिंगारदिवे, अभिजित अरकल अशा दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली.पथकाने १९ आणि २० ऑगस्ट रोजी गुप्त माहितीच्या आधारे जामखेड व तोफखाना परिसरात चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले.या कारवाईत एकूण ७३,७६६ रुपये किमतीचा बंदी असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.
शरद पुंडलीक शिंदे (वय २१, रा. खर्डा, ता. जामखेड),तुषार राळेभात (फरार),सार्थक राळेभात (फरार),राजू घोडके (फरार),
जामखेड पो.स्टे. (गु.र.नं. ५७२/२०२६): १६,६८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त,सुधीर अंकुश कोल्हे (वय ४९, रा. कोल्हेवाडी,ता.जामखेड), तुषार राळेभात (फरार),राजू घोडके (फरार),जामखेड पो.स्टे. (गु.र.नं. ५७३/२०२६): ४०,४०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त,समीर रशीद सय्यद (वय १९, रा. जामखेड),फैयाज तांबोळी (रा.भिंगार, अहिल्यानगर -फरार),राजू घोडके (फरार),तोफखाना पो.स्टे. (गु.र.नं. ७१५/२०२६): २,९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त सद्दाम इसाक शेख (वय ३१, रा.मुकुंदनगर,अहिल्यानगर),हसनेन नदीम शेख (वय २०, रा. मुकुंदनगर),आत्तु उर्फ आदीबखान आयुबखान पठाण (रा. शेवगाव – फरार),पाश्या उर्फ फिरदोसखान पठाण (रा. शेवगाव फरार) या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.अवैध धंद्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील,असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
