पत्रकार सुशील थोरात यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे तीन आरोपी अटकेत
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- अहिल्यानगर शहरातील साम टीव्ही चे पत्रकार सुशील थोरात यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक आज पहाटे संभाजीनगरच्या वाळुंज MIDC परिसरातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.गुरुवार (ता.२०) रोजी पाईपलाइन रोडवरील HDFC बँकेच्या समोर गाडीला धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून पत्रकार सुशील थोरात आणि त्यांचा मुलगा सार्थक थोरात यांना आरोपीनी बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेनंतर आरोपी फरार झाल्यावर त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विविध जिल्ह्यात शोधासाठी रवाना झाले होते.
आज पहाटे तिन्ही आरोपी संभाजीनगर MIDC परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. हेमंत उर्फ सोनू दत्तात्रेय कोहक,महेश उर्फ पप्पू दशरथ मते,प्रशांत शिवाजी निक्रड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
