राहाता (प्रतिनिधी) – मराठी भाषा नवव्या शतकापासून प्रचलित आहे.या भाषेचा विकास संस्कृत- प्राकृत- अपभ्रंश -मराठी असा झाला आहे.अकरा कोटींपेक्षा जास्त लोकांची ती मातृभाषा आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड मराठी भाषा विकासाचा सुवर्णकाळ होता. मराठी ही समृद्ध भाषा आहे असे उद्गगार ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ.जयंत डी.गायकवाड यांनी काढले.राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित “मराठी भाषा गौरव दिन” समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. डॉ.गायकवाड पुढे म्हणाले श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळतो. महाराष्ट्रात पंथ,जाती,धर्म, संप्रदाय अशी विविधता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अभंग, कीर्तन,ओवी,भारूड,पोवाडा, लोककला,लावणी यामुळे मराठी भाषा दर्जेदार बनली आहे.ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेच्या विकासात मोलाचे कार्य केले आहे.मराठी भाषेतही मोठ्या करिअरच्या व नोकरीच्या संधी दडलेले आहे पत्रकारितेच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतात. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो सोमनाथ घोलप व संस्थेचे डायरेक्टर डॉ.महेश खर्डे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.संजय लहारे हे होते ते म्हणाले, मराठी भाषा ही लवचिक भाषा आहे. मराठी भाषेने फारसी, उर्दू,इंग्रजी हिंदी,कानडी, आदि भाषेतील काही शब्द स्वीकारले आहे.मराठी शब्दकोश संग्रही असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने मराठीचा अभिमान बाळगून मराठीचा वापर जास्तीत जास्त होण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. यावेळी कु.स्वाती कांदळकर,कु.कोमल बोर्डे व कु.सपना गांगड यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मराठी विभाग प्रमुख डॉ.संजय कदम यांनी केले ते म्हणाले दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी “मराठी भाषा गौरव दिन” साजरा केला जातो.मराठी भाषेला दोन हजार वर्षापासूनची परंपरा आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाची ती भाषा आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्र शासनासह सर्व स्तरांतून जोरदार प्रयत्न सुरू आहे.व लवकरच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या निमित्ताने महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.जयंत गायकवाड यांचे हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे व रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनीही ग्रंथवाचनाचा मनमुराद आनंद घेतला.निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व रांगोळी स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला.या प्रसंगी महाविद्यालयातील कला विभाग उपप्राचार्य डॉ.दादासाहेब डांगे,ग्रंथपाल डॉ.दत्ता सातपुते,प्रा.चंद्रकांत बनसोडे,प्रा.अनिल मते,प्रा प्रियांका पेंडभाजे, प्रा शुभांगी जगताप,प्रा.प्रवीण कोळगे,डॉ. गोपीनाथ शिरोळे,डॉ.ऐनूर शेख,प्रा.शोभा जोशी,प्रा. अश्विनी तांबे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सोनाली रोहम व कु साक्षी भागवत यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. सत्यजित पोतदार यांनी मानले.
