अहमदनगर प्रतिनिधी (दि.४ मार्च):-महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा सध्या सुरू आहे.दि.३ फेब्रुवारी रोजी बारावीचा गणिताचा पेपर होता.या पेपरमध्ये कॉपी करत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील बारा कॉपी-बहाद्दरांवर भरारी पथकाने कारवाई केली आहे.गणिताच्या पेपरसाठी 26 हजार 922 विद्यार्थी होते. त्यापैकी 26 हजार 692 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते तर 230 विद्यार्थी अनुपस्थित होते.भरारी पथकाने पारनेर तालुक्यात सात तर नगर तालुक्यात पाच कॉपी-बहाद्दरांवर कारवाई केली.यामध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांनी नगर तालुक्यातील पाच तर पारनेर तालुक्यात उपशिक्षणाधिकारी माध्यमिक आकाश दरेकर यांनी एक, गटविकास अधिकारी किशोर माने यांनी तीन, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी दोन, विस्तार अधिकारी पी. जी. पळसे यांनी एका कॉपी बहाद्दरांवर कारवाई केली.या कारवाई मधून कॉपी बहाद्दराने चांगलाच धसका घेतला आहे.
