अहमदनगर प्रतिनिधी(दि.७ मार्च):नगर तालुका पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणावर छापा टाकुन 01 आरोपी विरुध्द कारवाई करुन 69,000/- (एकोणसत्तर हजार) रुपये किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने 1,200 लिटर कच्चे रसायन व 90 लिटर तयार दारु केली नाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई,श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार पोहेकॉ/तानाजी हिंगडे, संदीप पवार,संदीप घोडके, पोकॉ/मेघराज कोल्हे,योगेश सातपुते,विनोद मासाळकर व चापोहेकॉ/उमाकांत गावडे यांचे पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्यीमध्ये कारवाई करुन 01 ठिकाणी छापे टाकुन एकुण 69,000/- रुपये किंमतीचा मुद्येमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे 1,200 लि. कच्चे रसायन,90 लि.गावठी हातभट्टीची दारु जप्त व नाश करुन खालील प्रमाणे 01 आरोपी विरुध्द नगर तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण-01 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अ.नं. पोलीस ठाणे गुरनं व कलम आरोपीचे नांव जप्त मुद्येमाल
1. नगर तालुका 171/2023 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई) (फ) (क) (ड) 1) गोरख बाबा जपकर वय 30, रा.रानमळा,नेप्ती, अहमदनगर
60,000/- रु.किचे 1,200 लि.कच्चे रसायन
9,000/- रु.किची 90 लि. तयार दारु
एकुण 1 पुरुष
69,000/- रु. कि.ची 1,200 लिटर कच्चे रसायन, 90 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु व साधने
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर,श्री.अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर ग्रामिण विभाग,अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
