अहमदनगर प्रतिनिधी(दि.७ मार्च):-चिचोंडी पाटील तालुका नगर येथील सरकारी म.रा.वि.वि.कक्षात कमलेश युवराज पवार (वय 29 वर्षे धंदा नोकरी सहाय्यक अभियंता म.रा.वि.व.कंपनी मर्यादित)(राहणार नवले नगर,पारिजात चौक) हे कामकाज करत असताना तेथे दिलीप रामभाऊ कोकाटे रा.चिचोंडी पाटील ता.नगर तेथे आले व पवार यांना म्हणाले की तुम्ही माझ्यावर मागे कारवाई करून तुम्ही माझे शेती गट नंबर ७२०/१ मधील जप्त केलेली केबल मला परत द्या असे म्हणाले.परंतु पवार यांनी ती केबल मी परत देऊ शकत नाही असे म्हणाल्याचा कोकाटे यांना राग आला त्यांनी त्या क्षणी पवार यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करून व तू रस्त्यावर ये तुला ठार मारून टाकतो अशी धमकी दिली ही घटना दि.६ मार्च रोजी घडली.सहाय्यक अभियंता कमलेश पवार यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलीप रामभाऊ कोकाटे याच्यावर गुरन/१७२/२०२३, भादविक/३५३,३३२,३४२,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोसई युवराज चव्हाण करीत आहेत.
