अहमदनगर प्रतिनिधी (दि.८ मार्च):-सोशल मिडीयाव्दारे इंन्स्टाग्रामवर एका इसमाने चित्रफीत तयार करुन दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारे चित्रफितीव्दारे वक्तव्य केले बाबत कोतवाली पोलीसांना तक्रार प्राप्त झाली.त्यामध्ये आमचे धर्माविषयी काही असल्यास शिक्षा देणे कायदयाचे काम आहे.आणि आमचे कडुन काही चुकिचे काम झाल्यास आम्हास आतंकवादी म्हणुन नये व इतर वक्तव्य केली आहेत.त्या वरुन कोतवाली पोलीस स्टेशनला त्या इसमावर गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी परिस्थीतीचे गांभीर्य समजुन नमुद आरोपीस तात्काळ ताब्यात घेवून कारवाई करणेबाबत गोपनीय पथकातील अंमलदार यांना सुचना दिल्याने अंमलदार यांनी तात्काळ कारवाई करून सदर गुन्हयातील आरोपी नामे अयान अजीज शेख (रा.काटवन खंडोबा गाजीनगर अहमदनगर) यांस ताब्यात घेतले असुन पुढील कार्यवाही पोसई/सुखदेव दुर्गे हे करित आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोसई/सुखदेव दुर्गे, सफौ/राजेंद्र गर्गे,पोना/१००७ योगेश खामकर,पोकॉ/१४६४ अभय कदम,पोकॉ/१६१ उमेश शेरकर यांच्या गोपनीय पथकाने केली आहे.
