
अहमदनगर प्रतिनिधी(दि.८ मार्च):-नगर शहरातील सिव्हिल हडको परिसरात राहत असलेल्या राहुल रूपचंद हंपे वय वर्ष 43 यांचे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे.04 मार्च रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास सिव्हिल हडको येथे बस स्टॉप जवळ असलेल्या पान टपरीवर ते गेले असता,त्या ठिकाणी असलेला इसम नामे अक्षय बरकसे याने वरील फिर्यादी इसमाला दारू पिण्यासाठी मला पैसे दे नाहीतर तुला तलवारीने कापून टाकेन असं म्हणत धमकी दिली.मी विरोध केला असता आरोपी नामे अक्षय बरकसे व त्याच्या साथीदाराने लोखंडी गजाने मारहाण केली.या झटापटीमध्ये खिशातील एक हजार रुपये गहाळ झाले राहुल हंपे यांच्या फिर्यादीवरून अक्षय बरकसे व त्याचे इतर तीन साथीदार यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात कलम 324,323, 504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे वारंवार त्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.त्यावर मोक्का अंतर्गत देखील कारवाई झाली होती,या सराईत आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी फिर्यादीचे कुटुंबीय पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.