अहमदनगर प्रतिनिधी (दि.८ मार्च):-८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस दलातील नगर तालुका पोलीस ठाण्याच्या मपोना/मोहिनी कर्डक व बेलवंडी पोलीस ठाण्याच्या मपोना/सुरेखा वलवे यांना पोलीस दलामध्ये उत्कृष्टरित्या कामगिरी केल्याबद्दल प्रशंसापत्रक देण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग स्वाती भोर मॅडम,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अहमदनगर,श्री.कमलाकर जाधव पोलीस उपअधीक्षक गृह अहमदनगर यांच्या हस्ते हे पत्रक देण्यात आले.

