अहमदनगर प्रतिनिधी(दि.८ मार्च):-ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तसेच उत्कृष्ट प्रवक्ता,गायिका आणी गीतकार सौ.आरती हालदार यांना ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त U.S.ART GALLERY तर्फे (International Women’s Icon Award 2023) इंटरनॅशनल वुमन आयकॉन अवार्ड 2023 देवुन गौरवण्यात आले.आरतीजी हालदार मागील ३० ते ३५ वर्षापासून निस्वार्थ पणाने समाजसेवेचे अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करत आहे.सध्या आरती हालदार या अखिल भारतीय न्याय व सामाजिक विकास फाऊंडेशनचे चेअरपर्सन, बाल्मिकी विकास संघाचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्षा, बहुजन विकास संघाचे राष्ट्रीय सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.तसेच त्या Aaruhicks Diamond Pvt.Ltd. कंपनी आणी Twincle Music Co.च्या त्या मालक असुन चांगली गायिका आणी गीतकार पण आहे,”निला मेरा झेंडा लहराये शान से” त्यांचे हे भीमगीत संपूर्ण महाराष्ट्रभर खुप गाजले आहे.अशा अष्टपैलू गुण असणाऱ्या सौ.आरतीजी हालदार यांना International Women’s Icon Award 2023 पुरस्काराने सम्मानित केल्या बद्दल U.S. Art gallery चे व्यवस्थापक यांचे व संबंधित अधिकाऱ्यांचे मनापासून सौ.हलदार यांनी आभार व्यक्त केले व सांगीतले कि आज मी जे काही आहे आणी अनेक पुरस्कार मिळवलले आहे ते फक्त आणी फक्त विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे संभव झाले.इथुन पुढे माझे संपूर्ण जीवन त्यांचे विचार घेऊन समाज आणी देशासाठी सदेव कार्यरत रहाणार,मी बाबासाहेबांचे विचारावर एकनिष्ठ आहे, कितीही अडचण आली तरीही मार्ग बदलणार नाही कारण मी बाबासाहेबांचे विचारावर आहे,बाबासाहेबांचे विचार म्हणजे सिंहाचे दरारा,सत्यचे विहार,देशाचे आधार आहे. आरतीजी हालदार यांनी सांगीतले की आज हजारो लोक माझ्या सोबत कार्य करत आहेत,हे पुरस्कार आणी आज पर्यंत मिळालेले सर्व अवार्ड्स फक्त माझेच नसुन माझ्यासोबत कार्य करणारे सर्व कार्यकर्ता,पदाधिकारी आणी माझे कुटुंब या सर्वांचे आहेत.

